सातारचे दोन स्टार प्रचारक महाराष्ट्रभर फिरणार

खा. उदयनराजे भोसले, प्रा. नितिन बानुगडे पाटील यांना राज्यातून वाढती मागणी

या दोन स्टार प्रचारकांमुळे सातारचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा गाजणार आहे. तीस ते पन्नास वर्षांपूर्वी सातारचे सुपुत्र स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. किसन वीर, स्व. बाळासाहेब देसाई यांनी राज्यात आपला नाव लौकिक पोहोचवला होता. सध्याच्या पिढीत हे दोन स्टार प्रचारक सातारकरांची शोभा वाढवत आहे. अशी आता युवकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. प्रत्येक मतदारांनी मतदानाचा अधिकार वापरलाच पाहिजे, कारण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकांना खूप मोठे दिव्य करावे लागते याचे तरी भान ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सातारा – छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्याने देशाच्या राजकारणात आपला प्रभाव पाडला आहे. क्रांतीकारकांचा जिल्हा अशी ओळख झालेल्या या सातारा भूमितून इतर ठिकाणी जाऊन केंद्रात व राज्यात मंत्री, खासदार, आमदार, महापौर अशी महत्त्वाची पदे भूषविली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादीचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व शिवसेनेचे उपनेते तथा शिवव्याख्याते  प्रा. नितिन बानुगडे पाटील यांना महाराष्ट्रातून प्रचार सभेसाठी निमंत्रण येऊ लागले आहे. हा सातारकरांचा गौरव ठरला आहे.

सातारचे राष्ट्रवादीचे खा. भोसले हे उमेदवार आहेत. तर शिवसेनेचे प्रा. पाटील हे सातारा, सांगली, हातकणंगले, कोल्हापूर या चार लोकसभा मतदार संघात सेना-भाजप युतीचे समन्वयक आहेत. दोन्ही स्टार प्रचारक हे महाराष्ट्राचे लाडके आहेत. खासदार आपल्या स्टाईलमुळे ओळखतात. तर उपनेते यांच्या ओस्वी वाणीने शिवशाही आपल्या डोळ्यांसमोर आणली जाते. त्यामुळे सध्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी उमेदवाराच्या प्रचारासाठी खा. भोसले यांना आपला प्रचार करून महाराष्ट्रातील किमान चाळीस लोकसभा मतदार संघात आपल्या स्टाईलने प्रचारात रंगत आणावी लागणार आहे. तिच परिस्थिती भाजप-शिवसेनेची आहे. या ठिकाणी शिवसेनेत तेवीस तर भाजप व मित्रपक्ष पंचवीस मतदार संघात निवडणूक लढवित आहेत.

देश पातळीवर आपला प्रभाव असणारे बारामतीचे शरद पवार, ग्वॉल्हेरचे ज्योतीसिंहराजे सिंधीया हे अनुक्रमे सातारा जिल्ह्यातील नांदवळ ता. कोरेगाव व कण्हेर खेड या गावचे मुळचे सुपूत्र आहे. सध्या शिवसेनेचे उपनेते प्रा. पाटील हे भाजप सेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचाराचे नियाजनासाठी दोन दिवस साताऱ्यात थांबल्यानंतर 1 ते 27 एप्रिल पर्यंत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व ठाणे मुंबईत प्रचारातून फुले -शाहू, आंबेडकरांचे विचार त्याच बरोबर राजमाता जिजाऊ, छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांचे चरित्र व विचार मतदारांपर्यंत पोहोचवणार आहेत. तर राष्ट्रवादीचे व सातारचे उमेदवार खा. भोसले यांची एन्ट्री व त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल आणि फिल्मी डायलॉग तसेच सेना भाजपच्या कार्यपद्धतीवर शाब्दीक आसुड ओढण्याची त्यांची लकब आपल्या मतदार संघातील मतदारांनी पाहून आपल्याला मतदान करावे, अशी आघाडीच्या उमेदवाराची अपेक्षा आहे. त्यासाठी दोन्ही स्टार प्रचारकांना चार्टड विमान, हेलिकॉप्टर पासून ते अलिशान वाहनांचा ताफा वेळेप्रसंगी दुचाकीसुद्धा सज्ज ठेवण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)