राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सातारकर धावले उत्साहात

सातारा – सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग, लाच लुचपतप्रतिबंध विभाग आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘रन फॉर युनिटी’ अर्थात एकता दौड आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हिरवा झेंडा दाखवून या एकता दौडीचा प्रारंभ केला. सकाळी ठिक 7 वाजता निघालेली एकता दौड पोलीस मुख्यालय -पोलीस करमणुक केंद्र- मौती चौक- राधिका टॉकीज-सेव्हन स्टार-मनाली हॉटेल-प्रिया व्हरायटीज-पोलीस मुख्यालय अशी आयोजित करण्यात आली होती. विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ट्‌य अशा विविध घोषणा देत आणि घोष वाक्‍यांचे फलक घेऊन सर्व अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, विविध विद्यालयांचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, पोलीस पथक यांचा दौडीत समावेश होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)