वाई फेस्टिव्हलमुळे गणपती घाटाला यात्रेचे स्वरुप

वाई - उत्कर्ष श्री या बाॅडी बिल्डींग स्पर्धेमधील यशस्वी स्पर्धक.

रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धेसह बॉडी बिल्डिंग स्पर्धा उत्साहात

वाई – दरवर्षी वाई येथे साजऱ्या होणाऱ्या वाई फेस्टिव्हलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही या फेस्टिव्हलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाई फेस्टिव्हलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या रक्‍तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा पार पडल्या. त्याचबरोबर फेस्टिव्हलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष श्री या बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्येही स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाई फेस्टिव्हल अंतर्गत दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, असे उद्‌गार वाईचे सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांनी काढले. त्यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून या शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी आजपर्यंत 103 वेळा रक्तदान केलेले राजीव गायकवाड उपस्थित होते. याचबरोबर महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये जवळपास 50 महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. ज्येष्ठ पत्रकार भद्रेष भाटे व राजीव गायकवाड यांचे हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. महागणपती घाटावरील काशी विश्‍वेश्‍वर मंदिरामध्ये पार पडलेल्या या दोन्ही कार्यकर्मासाठी वाईतील नागरीक उपस्थित होते.

दरम्यान, वाई फेस्टिव्हल अंतर्गत झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत कराडचा शुभम भोईटे “उत्कर्ष श्री’चा मानकरी ठरला. सहा विविध वजनी गटामध्ये झालेल्या या स्पर्धेत 100 स्पर्धकांनी भाग घेतला होता. वाईचा शुभम बनकर बेस्ट पोजर व सातारचा शुभम मोहिते हा बेस्ट मस्क्‍युलर ठरला. यावेळी सुभाश डांगे (निवृत्त पोलिस अधिकारी) या वाई फेस्टिव्हलच्या आयोजकांचे या सातत्याबद्दल कौतुक केले. तत्पुर्वी वाई फेस्टिव्हलचे संस्थापक आनंद कोल्हापुरे यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्ज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

फेस्टीव्हलचे अध्यक्ष मदनकुमार साळवेकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले. याप्रसंगी उत्कर्ष पतसंस्थेचे संचालक आनंदराव कांबळे, श्रीकांत शिंदे, डॉ. मंगला अहिवळे, रमेश यादव तसेच मदन पोरे, सुनिल शिंदे, सचिन येवले, नगरसेवक राजेश गुरव, वाई जिमखान्याच्या संचालिका संगीता गुरव आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)