#2019LokSabhaPolls : उदयनराजेंनी कुटूंबासह बजावला मतदानाचा हक्क 

सातारा – भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक प्रक्रिया देशभरात सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील 14 मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. यावेळी, सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी देखील कुटुंबासह मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे.

यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई कल्पना राजे भोसले आणि पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी सुद्धा मतदान केले. राज्यातील 14 मतदारसंघातून 249 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे. या टप्प्यात 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)