यश मर्ढेकर याची महाराष्ट्र संघात निवड

सातारा – 11 जानेवारी 2019 ते 20 जानेवारी 2019 या कालावधीत खेलो इंडिया ही राष्ट्रीय स्पर्धा संपन्न होणार असून या स्पर्धेसाठी केएसडी शानभाग विद्यालय व ज्यु.कॉलेज सातारा येथील 11 वीत शिकणाऱ्या यश सतिश मर्ढेकर याची निवड झालेली आहे.

यापुर्वी अनेकदा त्याने राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावून महाराष्ट्र संघासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे. सातारा जिल्हयातून हा एकमेव खेळाडू 17 वर्षे वयोगटामध्ये सहभागी होणार आहे. तसेच फुटबॉल खेळाचे प्रशिक्षक अमित उघाडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाळेचे संस्थापक रमेश शानभाग संचालिका आंचल घोरपडे, मुख्याधिकारी रेखा गायकवाड, मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, सर्व शिक्षक वर्ग व परिवार यानी यशचे कौतूक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)