जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेत कात्रेश्वर हायस्कूलचे यश

वडूज  – येथील श्री कात्रेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत यश मिळविले. शिक्षण महर्षी डॉक्‍टर बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जिल्हा स्तरावर संस्थांतर्गत नागठाणे येथे कबड्डी स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या कबड्डी स्पर्धेमध्ये वर्षाखालील मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच शाहू स्टेडियम सातारा येथे झालेल्या मैदानी स्पर्धेमध्ये वर्षाखालील मुलिनीही कबड्डी मध्ये प्रथम क्रमांक मिळविला.

दोन्ही संघाची पारगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या संघांना शाळेचे मुख्याध्यापक लोहार डी ए सर व कलाशिक्षक अमर भागवत सर,खोत सर यांचे मार्गदर्शन लाभले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संस्थेचे विभाग प्रमुख आर व्ही शेजवळ सर, माजी सहसचिव मा आर के भोसले सर, अजीव सेवक के जे ढवळे सर, अजीव सेवक संपकाळ सर, कुडगुले सर, कातरखटाव गावचे उपसरपंच अविनाश बागल, पोपट बागल सर, राजेंद्र बागल सर, सुहास शिंगाडे सर, शशिकांत चिंचकर तसेच कातरखटाव च्या ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)