राजेंद्र घाडगे यांच्या प्रयत्नातून फत्यापुरला बंधारे मंजूर

नागठाणे – फत्यापूर (ता. सातारा ) गावचे सुपूत्र व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. प्रा. राम शिंदे यांचे स्विय सहाय्यक म्हणून कार्यरत असणारे राजेंद्र घाडगे यांच्या विशेष प्रयत्नातुन फत्यापूर गावाला दोन सिमेंट बंधारे मंजूर करण्यात आले.

मुंबई येथे दि. 8 रोजी मंत्रालयात जलसंपदा मंत्री ना. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत 48,56,697 रूपयेचा निधी या दोन सिमेंट बंधाऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला. या बंधाऱ्यांमुळे या परिसरातील भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत मिळणार असून चौदा हेक्‍टर सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घाडगे यांनी आजपर्यंत गावातील अनेक विकास कामासाठी भरीव मदत करत गावातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच योगदान दिले असून परिसरातील अनेक गावांना सुद्धा त्यांनी विकासकामांसाठी निधी मिळवून दिला आहे. गावासाठी सिमेंट बंधारे मंजूर केल्याबद्दल त्यांचे ग्रामपंचायत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आभार व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)