मायणीतील सायकलस्वार जगन्नाथपुरीला रवाना

जगन्नाथपुरी प्रवासादरम्यान घेतलेले छायाचित्र.( छाया : महेश जाधव )

दहा दिवसात 1650 किलोमीटर करणार प्रवास

मायणी – मायणी येथील सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपचे नऊ सदस्य जगन्नाथपुरी (ओरिसा) पर्यंत सुमारे सोळाशे पन्नास किलोमीटपर्यंत प्रवास सायकलने करणार आहेत या प्रवासादरम्यान सायकल चालवा पर्यावरण वाचवा, इंधनाची बचत काळाची गरज, आरोग्यासाठी उत्तम व्यायाम सायकल चालवा, असा संदेश देत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मायणी येथून मंगळवेढा, सोलापूर, नळदुर्ग, उमरगा, भांगुर, हैद्राबाद, सुर्यापेठ, विजयवाडा, निडादवेल्लू, नाकापल्ली, राणास्थलम, हरीपुरम, मालुड, ब्रम्हगिरी व जगन्नाथपुरी असा 1650 किलोमिटरचा सायकलचा प्रवास करणार आहेत.
विजय वरुडे,शिवाजी कणसे, राजेंद्र आवळकर, अनिल कुलकर्णी, सुनिल कुलकर्णी सर्व रा. मायणी ता. खटाव, अंबरिष जोशी, किर्लोस्करवाडी, ता. पलुस, मिलिंद कुलकर्णी, मिरज, ता. मिरज, किशोर माने सांगली व सागर माळवदे, पुणे हे नऊजण सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य या प्रवासात सहभागी झाले आहेत.

विविध तिर्थक्षेत्रांचा सायकलने प्रवास

यापुर्वी पंढरपूर, तिरुपती बालाजी, गणपतीपुळे, नळदुर्ग आणि कन्याकुमारीच्या असा सायकलने प्रवास केला आहे. आता जगन्नाथपुरी हे 1650 किलोमीटर आंतर प्रवास करुन येताना रेल्वेने येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)