येळगावकरांनी यशोदीप पतसंस्था मोडीत काढली

गोपूज : पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन करताना सुरेंद्र गुदगे, शिवाजीराव सर्वगोड आदी. (छाया : महेश जाधव )

सुरेंद्र गुदगे : गोपूजला पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन

मायणी – निवडणूक आली की जनतेचा कळवळा येणारे नेते तालुक्‍यातील आहेत. त्यातीलच माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आहेत. त्यांनी कोट्यवधीची यशोदीप पतसंस्था मोडीत काढली. आता ते पाण्याचे गाजर दुष्काळी जनतेला दाखवीत फिरत आहेत. अशा प्रवृत्तीपासून जनतेने सावध राहण्याचे गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद सुरेंद्र गुदगे यांनी केला. ते गोपूज (ता. खटाव) येथे 60 लाखांच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या भूमिपूजनावेळी बोलत होते. समाज कल्याणचे सभापती शिवाजीराव सर्वगोड, सरपंच प्रतिनिधी महादेव जाधव, बांधकाम विभागाचे जाधव,शिवाजीराव पवार, मार्केट कमिटीचे संचालक गिरीश शहा आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुदगे म्हणाले, गोपूज हे गाव मायणी जिल्हा परिषद गटात नसलेतरी येथील जनतेने कै.भाऊसाहेब गुदगेंच्यावर प्रेम केले आहे. त्यामुळे इथल्या जनतेशी गुदगे घराण्याशी बांधिलकी आहे. त्यातून उतराई होण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेतून 60 लाखांचा पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करून त्याचे भूमिपूजन केले. विकासकामात गट-तट विसरून एकत्र येऊन गावचा विकास करू पाहण्याऱ्या गोपूजच्या ग्रामस्थांचा आपणास अभिमान असून विकास कामासाठी आपण सहकार्य करू.

आगामी निवडणुकीत तालुक्‍यातील नेते मतांच्या जोगव्यासाठी दारात येतात. त्यात माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर असतील. त्यांनी कोट्यवधीची यशोदीप पतसंस्था व दुधसंघ, इथेनॉल प्रकल्प मोडीत काढले. आता ते दुष्काळी जनतेसाठी पाण्याचे गाजर दाखवून मत फिरतं असून अशा खोटारडेपणा करणाऱ्या प्रवृत्तीपासून जनतेने सावध राहण्याची गरज आहे.

सर्वगोड म्हणाले, येथील शेतकऱ्यांचे आजारपणातील पशुधन वाचवण्यासाठी औध व वडूजला जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची जनावरे ने-आण करण्यात जनावरांची होणारी फरफट थांबणार आहे. त्यासाठी गुदगे यांच्याकडे पशुवैद्यकीय दवाखान्याची गोपूजच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. त्यास गुदगेंनी निधीचा तर जालिंदर पवार यांनी 12 गुंठे जागा देवून जागेचा प्रश्न सोडवला. यावेळी बाळासाहेब खराडे, बाळासाहेब घार्गे, मारुती खराडे, नाना खराडे, नारायण घार्गे, विनायक घार्गे, संभाजी घार्गे, दस्तगीर मुल्ला, दत्तात्रय घार्गे, विनोद खराडे, विजय खराडे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)