व्हीव्हीपॅटमशीनमुळे मतदानविषयी गैरसमज दूर होतील

बुध : व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखवताना मंडलअधिकारी अमृत नाळे, तलाठी सुनिल सत्रे, अमोल जाधव, गणेश सातपुते, रवींद्र राजेघाटगे. (छाया : प्रकाश राजेघाटगे)

बुध – ‘ ईव्हीएम मशीन बाबत असणारा मतदारांचा गैरसमज दूर करण्याकरिता नवीन तंत्रज्ञानयुक्त व्हीव्हीपॅट मशिन जोडप्यात येणार असून या माध्यमातून केलेले मतदान पाहता येईल आणि आपण केलेल्या मतदानाविषयी गैरसमज राहणार, असे प्रतिपादन मंडलाधिकारी अमृत नाळे यांनी केले.

बुध, ता. खटाव येथे ईव्हीएम मशीनवरून लोकसभा निवडणूकीचे मतदान कसे होईल, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी तलाठी सुनिल सत्रे, अमोल जाधव यांनी मतदारांना मशीनविषयी माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी सरपंच अभयसिंह राजेघाटगे, ग्रामपंचायत सदस्य गणेश सातपुते, रवींद्र राजेघाटगे, सत्यवान जाधव, विजय रजपुत, सतिश कदम, अशोक निंबाळकर, संतोष सुर्यवंशी, समीर देसाई, सुरेश कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)