मुस्लीमांसाठी सर्व पातळीवर पंधरा टक्के आरक्षण द्या

सादिक खाटीक यांची मागणी

आटपाडी – मुस्लीमांसाठी ओबीसी मध्ये 7 टक्के, अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीमध्ये प्रत्येकी 4 टक्के असे एकूण 15 टक्के आरक्षण नव्याने वाढवून ते मुस्लीमांसाठीच आरक्षित करावे.विकासाच्या मुख्य प्रवाहात मुस्लीमांना आणण्यासाठी राज्य, केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत असे आवाहन मुस्लीम खाटीक समाजाचे राज्याचे अध्यक्ष सादिक खाटीक यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुस्लिमांना आरक्षण मिळावे यासाठी आटपाडी तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला मार्गदर्शन करताना सादिक खाटीक बोलत होते. मुस्लीम आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष रशिद शेख हे अध्यक्षस्थानी होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मुस्लीमांना त्यांच्या हक्काचे 15 टक्के आरक्षण दिले गेले असते तर स्वातंत्र्याच्या सत्तरी पर्यत मुस्लीमांचे किमान एक हजार खासदार पंधरा हजार आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, महानगरपालिकांचे लाखो सदस्य होवू शकले असते.

शैक्षणिक आणि नोकऱ्यातील आरक्षणाच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रातल्या कनिष्ट पातळीपासून सर्वोच्य पातळीवरच्या लाखो नोकऱ्यांमध्ये मुस्लीम सामावले गेले असते. मुस्लीमांना सर्वच पातळ्यावरचे आरक्षण न दिल्याने मुस्लीमांच्या अनेक पिढयांची अक्षरश: माती झाली आहे. आरक्षण नसल्याने मुसलमानांचे लाखो-कोटींचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे,असे सादिक खाटीक यांनी सांगितले.यावेळी भारीप बहुजन महासंघाचे नेते अरुण वाघमारे, मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष सुरज पठाण, मुस्लीम आरक्षण आंदोलनचे जिल्हाध्यक्ष मुनीर मुल्ला, अमित वाघमारे, भाजपाचे प्रणव गुरव, इत्यादींची भाषणे झाली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहसीन तांबोळी यांनी केले. या आंदोलनात समितीचे तालुका अध्यक्ष अजमुद्दीन इनामदार, भाजपाचे बॅरिस्टर मुलाणी, अरिफ इनामदार, नौशाद मुलाणी, अनिसभाई खाटीक, कॉंग्रेस आयच्या अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष असीफ उर्फ बाबू खाटीक, मुन्ना तांबोळी, मुन्ना मुलाणी, पिंटू ऐवळे, महादेव वाघमारे, आण्णासाहेब भोरे, अमीर शेख, दादासाहेब पांढरे, विलास वामन, योगेशदादा घोलप, नितीन जाधव इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)