वाईतील रस्ता दुभाजक ठरतायत शोपीस

-पादचारी मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात
-स्वच्छता अभियानाची मोहीम फक्त कागदावरच
-पादचारी मार्ग कधी मोकळा श्‍वास घेणार?
-नियोजनशून्य कारभारामुळे अनेकांचे बळी

मेणवली – वाई बांधकाम विभागाने उभारलेल्या रस्ता दुभाजकात झाडांऐवजी कचऱ्याची लागण होत आहे. पादचारी मार्गावर दुकानदारांनी कब्जा केला असल्याने पालिकेने वाई शहरात राबवलेल्या स्वच्छता अभियानाची मोहीम फक्त कागदावरच राहिली आहे.

वाई शहर आगमनापासूनचे भिमनगर, बाजार समिती, बावधन नाका, काशी कापडी वस्ती, मिशन हॉस्पिटल ते वाईचे बसस्थानक दरम्यान उभारलेले मुख्य रस्ता दुभाजक व नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने बांधलेल्या पादचारी मार्गाची अतिक्रमणाने केलेली दयनीय अवस्था पाहता शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी वाई शहराच्या शुशोभीकरणाचे नुसते दिखाव्याचे देखावे उभे केले आहेत. वाई आगमनाच्या सुरवातीलाच भीमनगर रस्त्याच्या दुतर्फा पसरलेलं घाणीचे साम्राज्य सर्वांचे स्वागत करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बांधकाम विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे बांधलेले रस्ता दुभाजक अनेकांचे बळी घेत प्रवाशांच्या मानेवर सतत मृत्यूची टांगती तलवार धरत आहे. नाकर्तेपणामुळे रस्त्यावरील दुभाजक शोभेच्या झाडांऐवजी कचऱ्याच्या ढिगाने भरू लागल्याने स्वच्छ वाई सुंदर वाईचा नारा हवेत विरून गेला आहे.

दुसरीकडे वाई शहरातील नागरिकांच्या सुरक्षततेसाठी बांधलेल्या पादचारी मार्गावर लगतच्या दुकानदारांनी आपल्या धंद्याचे संसार साहित्य मांडल्याने पादचारी मार्गाचा जीव गुदमरून गेला आहे. याचे कसलेही सोयरसुतक नगरपालिका व बांधकाम प्रशासनाला नसल्याने सर्व नागरिकांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्याचा आधार घ्यावा लागत आहे. हे लक्षात घेता स्वच्छ भारत अभियान घोषणेचे फलक शोपीस ठरत आहेत.

कचऱ्याने भरलेले दुभाजक झाडा फुलांनी कधी बहरणार? दुकानदार धंदेवाल्यांच्या अडगळीने बहरलेले पादचारी मार्ग कधी मोकळा श्‍वास घेणार? वाई शहराला आणलेली अवकळा कधी संपणार? का प्रशासन नुसत्याच घोषणा करणार? असे अनेक प्रश्‍न वाई शहरवाशीयांकडून विचारले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)