नोकरीच्या आमिषाने 3 लाखांचा गंडा

file photo

महानगरपालिकेत नियुक्तीचे दिले होते बनावट नियुक्तीपत्र

पुसेसावळी – नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावतो, असे सांगून व बनावट सही, शिक्‍यासह खोटे नियुक्तीपत्र देऊन तीन लाखाला गंडा घातल्याप्रकरणी कडेगाव (जि. सांगली) येथील राज केतन सरनाईक या भामट्याविरुद्ध औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाळासो बापूसो डुबल (रा. हनुमानवाडी, ता. कराड) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचा मुलगा अनिकेत याला सरनाईक याने नोकरीस लावतो म्हणून जानेवारी 2018 मध्ये पुसेसावळी येथील मेहुणे सूर्यकांत कदम यांच्या घरी कागदपत्रे व 80 हजार रुपये घेतले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे द्यावे लागतील, असे सरनाईकने सांगितले होते. त्याने फेब्रुवारी 2018 मध्ये अनिकेतला व्हॉटस्‌ ऍपवर महानगरपालिकेचे सुपरवायझर पदाचे नियुक्तीपत्र पाठवले.

फाईल तयार होईल, असे सांगून 35 हजार रुपये बॅंक ऑफ इंडिया कराड शाखेतून राज सरनाईक याच्या खात्यावर पाठवण्यास सांगितले. अनिकेतने ते पाठवून पुन्हा 15 दिवसांत 32 हजार 800 रुपये पाठवले. त्यानंतर सरनाईक याने अनिकेतची फाईल तयार झाली असून तिसरा हप्ता म्हणून 50 हजार पाठवण्यास सांगितले. ती रक्कम सरनाईकच्या खात्यावर भरली. सरनाईक याने हनुमानवाडी येथील घरी येऊन अनिकेतच्या नावाची

नवी मुंबई महानगरपालिका नावाची फाईल दिली. त्यावर विभागीय अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका सी विभाग वाशी असा शिक्का आहे. मी बोलवीन त्यावेळी मुलाला फाईल घेवून पाठवून द्या, असे सरनाईक याने सांगितले. मे 2018 मध्ये अनिकेतला हजर करुन घ्यायचे आहे. 82 हजार 200 रुपये घेवून पाठवा, असे सांगितले.

दि. 12 जून 2018 ला अनिकेत मुंबईस गेला त्यावेळी ज्या अधिकाऱ्याने आपले काम केले त्यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या मॅडम आल्या आहेत, असे सांगून घरी पाठवले. त्यानंतर सरनाईक याने वरिष्ठ अधिकारी नवीमुंबई महानगरपालिका बेलापूर भवन असे सही शिक्क्‌याचे नियुक्तीपत्र 10 ऑक्‍टोबरला व्हॉटसअपवर पाठवून सरनाईकने अनिकेतला तू मुंबईला येवू नकोस काम पुढे ढकलले आहे असे सांगितले. त्यानंतर सरनाईक यास फोन करुन कामाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व पैसेही परत दिले नाहीत, असे तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. जी. कुबडे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)