कोतवाल संपामुळे सातारा रेकॉर्ड रूम ठप्प

नागठाणे : नागठाणे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कोतवाल संपामुळे सातारा येथील रेकॉर्डरुमचे कामकाज ठप्प झाले असून येथे येणाऱ्या नागरिकांना जुन्या दस्तऐवजासाठी हेलपाटे मारावे लागत असून आर्थिक व मानसिक मनस्ताप सोसावा लागत आहे.

सातारा तालुक्‍यामध्ये जुने फेरफार उतारे मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे तहसिल ऑफिस सातारा मधील रेकॉर्ड रूम. पण या रेकॉर्ड रूमला केवळ एकच किपर असून येथे अपूरा कर्मचारी वर्ग असल्याने परिसरातील गावांमधील कोतवालांना 7/12 उतारे, जुने फेरफार, दस्त, जुने कोर्ट निकाल काढण्यासाठी त्यांची या रेकॉर्ड रूमला नेमणूक केली आहे.परंतू कोतवालांनी संप केल्याने महसूल विभागाची व्यवस्था कोलमडली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोतवाल चतुर्थ श्रेणी व वाढीव मानधऩासाठी जिल्हाअधिकारी यांच्या समोर धऱणे आंदोलन करीत आहेत सरकारने त्यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याच्या मानधऩात वाढ करण्यांची गेल्या अऩेक वर्षापासूनची मागणी अखेर सरकारने मान्य केली त्याच बरोबर महसूल विभागातील चतुर्थ श्रेणी संवर्गातील शिपाई पदासाठी 25% पदे कोतवालांना राखीव होती ती मर्यादा वाढवून आता शिपाई पदासाठी 40% पदे कोतवाला मधून भऱण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

तसेच ऱाज्य शासकिय कर्मचारी समुह अपघात विमा अटल निर्वती वेतन, महात्मा फुले जन आऱोग्य योजना अशा अनेक योजना यांना लागू करण्याचा निर्णय शासन पातळीवर चालु आहे. तरीही हे संपाचे हत्यार काही खाली ठेवण्यास तयार नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जुने सातबारा, खाते उतारे व इतर दाखले मिळणे अवघड झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)