एस कॉर्नरवर अपघात 1 ठार, 3 गंभीर जखमी

शिरवळ – खंबाटकी घाटातील एस कॉंर्नरवर बेंगरुटवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत साखर घेऊन जाणारा ट्रक व ट्रॅक्‍टर यांच्यात झालेल्या अपघातात एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.

साखरेच्या ट्रकने ट्रॅक्‍टरला धडक दिल्यानंतर ट्रक पलटी झाला . या अपघातात अशोक शामराव जाधव वय 45 रा. बोपेगांव ता. वाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.अथणी ( कर्नाटक ) येथून साखरेची पोती घेऊन मालट्रक हा पुण्याच्या दिशेने निघाला होता. आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास खंबाटकी बोगदा ओलांडून पुण्याकडे जाताना एस कॉर्नरवर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ट्रकने पुढे चाललेल्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. सुमारे शंभर फूट लांब ट्रॅक्‍टर ट्रकने पुढे रेटत नेला. रस्त्याच्या कडेला असलेला संरक्षक कठडा व ट्रकच्या मध्ये ट्रॅक्‍टरचा चक्काचूर झाला. ट्रकमधील साखरेची पोती रस्त्यावर विखूरली गेली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अपघातात ट्रॅक्‍टरमधील अशोक जाधव वय 45 रा. बोपेगांव हे उपचारादरम्यान ठार झाले तर सहकारी बाळासाहेब गोविंद जाधव वय 54 रा. पांडे , ट्रकमधील अमोल काशीनाथ वाघ वय 26 , संदीप वीर भोसे वय 27 हे गंभीर जखमी झाले आहे . या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)