उदयनराजेंना हिरवा कंदील

File Photo..

खा. शरद पवार यांचे कोल्हापुरात स्पष्ट संकेत

सातारा – सातारचे खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडीक यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हिरवा कंदील जदला आहे.कोल्हापुरात विविध कार्यक्रमासाठी आलेल्या शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना तसे स्पष्ट संकेत दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी पवार यांना सातारा आणि कोल्हापूर लोकसभेच्या जागेबाबत विचारणा केली असता त्यांनी या जागांबाबत कोणताही प्रश्‍न शिल्लक राहिलेला नाही अशा स्पष्ट शब्दात आपली भुमिका जाहीर केली. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याने मुंबई येथे झालेल्या बैठकीत चक्क आमदार हसन मुश्रीफ यांनीच स्वतः लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे म्हंटले होते. त्यामुळे शरद पवार यांच्यासमोर एक मोठा तिढा निर्माण झाला होता.सातारा लोकसभा उमेदवारीबाबतही संभ्रम होता.त्यामुळे पवार यांच्या बोलण्यावरून कोल्हापूरातील धनंजय महाडिक आणि साताऱ्यातील उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला त्यांनी हिरवा कंदील दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

पवार म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांचा विषय थोडा लांब ठेवला आहे. सध्या लोकसभेच्या 48 जागांचा विषय होता. त्यातील 40 जागांचा विषय संपला आहे.8 जागांचा विषय बाकी आहे. प्रत्यक्ष ठिकाणी अडचणी येत आहेत.पण त्या ठिकाणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पैकी बहुमत कोणाला मिळत याची तपासणी सुरू आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यापैकी प्रभावी उमेदवार या ठिकाणी देणार आहे.

मुश्रीफ हे मोठे नेते आहेत. त्यांचा उपयोग महाष्ट्राच्या विधी मंडळात जास्त होईल. पण त्यांनी घेतलेली भूमिका सुद्धा समजून घेतली जाणार आहे. यावेळी पवारांनी जागावाटपाबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले, की राज्यात ज्याची जास्त ताकद त्या पक्षाला जास्त जागा असे सूत्र असायला हवे. त्यानुसार जागावाटप व्हायला हवे. कॉंग्रेससोबत आघाडी करण्यासंबंबधी चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. देश पातळीवर आम्ही एकत्र येण्याच विचार नाही. पण, राज्य पातळीवर एकत्र निवडणूक लढवू असे पवार म्हणाले. भाजपा सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असून लोक आता संतापले आहेत.

काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरचे जेष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीचे सदस्यत्व स्वीकारले याबाबत संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. याबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले, गेले चार वर्षे ते मागे लागले होते की, मला राष्ट्रवादी चे सभासद व्हायचे आहे. याबाबत त्यांनी सातत्याने आग्रह धरला होता. शिवाय डी. वाय. पाटील हे माझे हितचिंतक आहेत. पक्षाला गरज पडली तर ते आम्हाला मार्गदर्शन सुद्धा करतील. ते राजकारणात सक्रिय नसले तरी हितचिंतक म्हणून आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)