गांजा बाळगल्याने दोघांवर गुन्हा

सातारा – अवैधपणे गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार इनायतुल्ला मुल्ला यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ख्वाजा आब्बास खान, विनायक हेगडे (दोघे रा. शनिवार पेठ,सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

संशयीत आरोपी हे साताऱ्यात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शनिवार पेठेतील एका घराच्या पाठीमागील बाजुला सापळा लावला होता. त्यावेळी दोन युवक संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली.

अंगझडती घेताना पोलिसांना संशयीतांच्या ताब्यातील प्लास्टीक पिशवीत गांजा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत, गांजा अवैधपणे बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला . दाखल गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष चौगुले करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)