पाचगणीत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

file photo

पाचगणी  – पाचगणी व्यायाम मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भव्य अशा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 13 जानेवारी ते 17 जानेवारी अखेर पाचगणी येथे आयोजित केल्या असून जास्तीत जास्त संघांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भिलारे व उपाध्यक्ष नानासाहेब कासुर्डे यांनी केले आहे.

पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील भाऊसाहेब भिलारे क्रीडा भूमीवर या स्पर्धा होणार असून या कबड्डी स्पर्धा वजनी गटात होत आहेत. 35 व 50 किलो गटासाठी स्थानिक खेळाडू खेळवले जातील तर 65 किलो आणि खुल्यागटासाठी ही स्पर्धा हौशी स्वरूपात होणार असल्याची माहिती राजेंद्रशेठ राजपुरे यांनी दिली. जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत आपले नाव नोंदवण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी नारायण बेलोशे, विठ्ठल गोळे, शेखर कासुर्डे, अजित कासुर्डे, दिलीप बगाडे, अंकुश मालुसरे, हरीश भिलारे, प्रवीण भिलारे, स.म.बेलोशे गुरुजी, यशवंत पार्टे, राजेंद्र भिलारे, शरद कासुर्डे, निसार सय्यद तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)