पोषण आहार कर्मचाऱ्यांचे 9 जानेवारी रोजी आंदोलन

वडूज – महाराष्ट्र राज्य आयटकच्यावतीने बुधवार दि. 9 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे आंदोलन आयोजित केल्याची माहिती संघटनेचे महासचिव शौतभाई पठाण, संघटक गुणवंतराव साळुंखे, जिल्हाध्यक्षा कविता उमाप यांनी दिली.

पोषर आहार कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवावे, या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, 60 वर्षावरील कर्मचाऱ्यांस 5 हजार रुपये पेन्शन मिळावी. पंतप्रधान मोदी यांच्या आश्वासनाप्रमाणे प्रत्येक कुटुंबास 15 लाखाचा निधी मिळावा. या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

जिल्हा सचिव सुजाता पवार, कोषाध्यक्ष अर्चना अहिरेकर व सहकारी आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. या आंदोलनात खटाव-माण तालुक्‍यातील पोषण आहार कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खटाव तालुका अध्यक्षा आशाताई भांडवलकर यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)