नायगांव येथे गुरूवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती

शिरवळ – सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती खंडाळा व समस्त ग्रामस्थ मंडळ नायगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य स्त्री समाज सुधारक व स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 188 व्या जयंती उत्सव व भारतीय स्त्री मुक्ती दिन गुरूवारी, 3 रोजी सकाळी दहा वाजता नायगांव (ता. खंडाळा) येथे होणार असल्याची माहिती सरपंच निखील झगडे यांनी दिली.

भारतातील आद्य स्त्री शिक्षिका व स्त्री शिक्षणाच्या जनक आणि नायगांवची थोर सुकन्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 188 व्या जयंती उत्सव व भारतीय स्त्री मुक्ती दिनानिमित्त गुरूवारी, 3 रोजी सकाळी साडेआठ वाजता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची मिरवणूक, सकाळी दहा वाजता जयंती उत्सव राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी विधानपरिषदेचे सभापती ना. राजराजे नाईक निंबाळकर, जलसंधारण व ओबीसी कल्याणमंत्री ना. प्रा. राम शिंदे, पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, माजी उपमुख्यमंत्री छगनराव भूजबळ, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, कृषी व फलोत्पादन पणन राज्यमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)