पुसेगावात गुरूवारपासून राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शन

पुसेगाव - प्रदर्शन ठिकाणी स्टाॅल उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

पुसेगाव – पुसेगाव ता. खटाव येथे श्रीसेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त देवस्थान ट्रस्ट व स्मार्ट एक्‍स्पो यांच्या वतीने दि. 3 ते 7 जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शन आयोजन केले आहे. प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात असून स्टॉल उभारणीचे काम सुरु असल्याची माहिती संयोजक सोमनाथ शेटे यांनी दिली.

या कृषी प्रदर्शनात राज्यातील विविध क्षोतील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. प्रात्यक्षिकासह तसेच विविध नाविन्यपूर्ण गोष्टी पाहण्याची नामी सुवर्णसंधी शेतकऱ्यांसह भाविक व यात्रेकरूंना मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या बटाटा, बेदाणा, सेंद्रीय गूळ, हळद पावडर, संत्रा स्ट्राबेरी, ऍपल बोर, सेंद्रीय भाजीपाला, तसेच ड्रॅगल फ्रुट ब्रोकोल इत्यादी परदेश भाजीपाला पिकांचे खास दालन उभारण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जलयुक्त शिवार, शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री व शेती विषयक तसेच मस्य शेती यासह सामान्य शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती देणारे विविध नाविन्यपुर्ण स्टॉल उभारले जाणार आहेत. आधुनिक, कोरडवाहू, ठिंबक, पॉलिहाऊस शेती, नामांकित कंपन्या, कृषी विद्यापीठे, शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल व यंत्रसामुग्रीसह विविध स्टॉल असल्याने शेतकऱ्यांसाठी ही मोठी पर्वणी आहे.

जलसंधारण, पाणी अडवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, तसेच कोरडवाहू शेतीचा विकास करण्याच्या दृष्टीने शेती व दुग्धव्यवसाय, रेशीम, उद्योग, कुक्कटपालन, मत्स्य व्यवसायासोबतच कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त यांत्रिकीकरण, शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन विक्री व्यवस्थापन विविध पिकांचे कृषी संलग्न व्यवसायाशी संबंधित शेतकरी समुह किंवा गट व त्यांचे संघाद्वारे करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

शिवाय कृषी व पणन, सहकार, फलोत्पादन, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, नवी दिल्ली, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे, राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय पुणे, वखार महामंडळ, कृषी उद्योग, पणन मंडळ, राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळ पुणे, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकाही सहभागी होणार आहेत. शेती संबंधातील मोठ्या कंपन्या, शासकीय कृषी योजनासंबंधी माहिती देणारे स्टॉल, तसेच या प्रदर्शनामध्ये ग्रीन हाऊसचे आधुनिक मॉडेल, टिश्‍यू कल्चर, पॉली स्प्रिंकलर, पशुसंवर्धन यांसह कृषि पर्यटनाची वाढ व्हावी, या दृष्टीने या प्रदर्शनातून प्रबोधन करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)