जमीन विकण्याच्या वादातून एकाला मारहाण

नीरा – जमीन विक्रीच्या व्यवहारातून चौधरवाडी येथील एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन जणांवर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नाव अभय शिवाजी निगडे व विजय सदाशिव निगडे (रा. गुळुंचे, ता. पुरंदर) आहे.

याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुळुंचे नजीकच्या जमिनीच्या व्यवहारात अभय निगडे व विजय निगडे या दोघांनी हस्तक्षेप केला.

गावातील जमिनी आम्हाला न विचारता परस्पर विकायच्या नाहीत असे म्हणत पांडुरंग दगडे यांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, अभय शिवाजी निगडे व विजय सदाशिव निगडे यांनी सहा महिन्यांपूर्वी गावातील महिला पत्रकाराच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)