अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

भुईंज – भुईंज येथे महामार्गावर कृष्णा नदीच्या पुलानजीक पादचाऱ्यांस अज्ञात वाहनाने ठोकरल्याने पादचारी जागीच ठार झाला. याबाबत घटनास्थळ व भुईंज पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा नदीच्या पुलानजीक महामार्ग ओलांडताना एका वयोवृद्ध पादचाऱ्यांस भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने निघालेल्या वाहनाने ठोकर दिल्याने पादचारी जागीच ठार झाला.

घटनास्थळी भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे हवालदार तुकाराम पवार, गोळे, दुदुसकर यांनी मदतकार्य केले. दरम्यान, अपघातात ठार झालेला वयोवृद्ध पादचारी पाचवड येथील गोपाळ समाजातील आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)