खटाव येथे रक्तदान शिबीर उत्साहात

खटाव – राष्ट्रीय सेवा योजना,शहाजीराजे महाविद्यालय, खटाव व अक्षय बल्ड बॅंक ,सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार चंद्रहार पाटील (दादा) यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दि.31 रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले.

प्राचार्य संजय पाटील यांच्या हस्ते आदरणीय दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण केला. दरम्यान विद्यार्थांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सुनिल पाटील, राजेंद्र भोसले, पर्यवेक्षक पी.डी.कुलकर्णी, डॉ. यु. आर. जाधव, प्रा. एम. आय. शेख, प्रा. जे. यु. चोथे. प्रा.एम.आय. येलपले, प्रा. जी. पी.साळवे, प्रा. जे.पी. कदम, प्रा. प्रमोदिनी कांबळे, प्रा. बी. बी. राठोड आदिंसह आजी -माजी प्राध्यापक, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. तदनंतर रक्तदान मोहीमेस प्रारंभ झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाविद्यालयीन युवक-युवतींनी या मोहिमेस प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला. अक्षय बल्ड बॅंक, साता-याचे रक्तपेढी समुपदेशक अरूण दळवी यांच्या टीमने जवळ-जवळ पंन्नास रक्तदात्यांचे रक्त घेऊन मोहीम यशस्वीरीत्या राबविली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. बी. पवार यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)