नवीन वर्षाचे स्वागत व्यसन करून नको : रमेश उबाळे

कोरेगाव  – एकीकडे अनेकजण हॉटेल, ढाब्यावर जाऊन नवीन वर्षाचा आनंद घेत असतानाच आज 31 डिसेंबर रोजी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे व कार्यकर्त्यांनी भाकरवाडी, ता. कोरेगाव येथे जाऊन अंधविद्यार्थ्यांसोबत नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करून नवीन वर्षाचे स्वागत केले. यावेळी व्यसन करून नवीन वर्षाचे स्वागत करु नका. त्याऐवजी ते पैसे अंध, अपंगांना मदत म्हणून द्या, असे आवाहनही उबाळे यांनी यावेळी केले.

भाकरवाडी, ता. कोरेगाव येथील अंधशाळेत जाऊन रमेश उबाळे तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवीन वर्षाचे स्वागत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून केले. शहराध्यक्ष राहुल बर्गे, तालुकाध्यक्ष निलेश यादव, शहर उपआध्यक्ष वैभव बर्गे, ल्हासुर्णे ग्रामपंचायत सदस्य गणेशजी घाडगे उपस्थित होते. रमेश उबाळे म्हणाले, युवकांनी नवीन वर्ष कुठे तरी पार्टी करून साजरी करू नये.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समाजातीले उपेक्षित घटक आहेत त्यांना आधार देऊन त्यांना मदत करून नवर्षाचा आनंद घेतला पाहिजे. शरीर ही आपणास मिळालेली एक देणगी आहे. व्यसन करून शरीराचे नुकसान करून घेण्यापेक्षा आपण समाजाचे काही तरी देणे लागतो म्हणून पार्टी करण्यासाठी लागणारे पैसे समाज सेवा, अंध, मतिमंद,कुपोषित मुलांसाठी खर्च केले तर खऱ्या अर्थाने आपण नवीन वर्ष साजरे केल्याचा आनंद मिळेल. आपल्या व्यसनाचा त्रास आपणास तसेच आपल्या कुटूंबालाही होतो. दीर्घायुषी होण्यासाठी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे, आवाहन उबाळे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)