… अन्यथा, मला माझा मार्ग मोकळा

आ. जयकुमार गोरे; निवडणुकीत आघाडी प्रामाणिकपणे करा

खटाव – ज्या लोकसभा निवडणूकांमध्ये दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाली त्या प्रत्येक निवडणूकांत आम्ही प्रामाणिकपणे आघाडीचेच काम केले आहे. मात्र, आघाडीची विधानसभा निवडणूक आली की आमच्या सहकाऱ्यांच्या अंगात येते. आमचा फक्त वापरच करुन घेतला जातो. येणाऱ्या निवडणूकांमध्येही आघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही निवडणूकांत प्रामाणिक आघाडी झाली तर ठिक अन्यथा मला माझा मार्ग मोकळा आहे. माण आणि खटावमध्ये सरकार फक्त जयकुमारचेच चालते हे सगळ्यांनीच लक्षात ठेवावे असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीसह सर्वच विरोधकांना दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भालवडी, ता. खटाव येथे विविध विकासकामांचे उद्घाटन झाल्यानंतर आयोजित मार्डी गणाच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. तालुकाध्यक्ष एम. के. भोसले, अर्जुनराव काळे, जि. प. सदस्य अरुण गोरे, भगवानराव गोरे, सोनिया गोरे, सिध्दार्थ गुंडगे, हरीभाऊ जगदाळे, रजकुमार पोळ, विठ्ठलराव भोसले, काकासाहेब माने, किसनशेठ सस्ते, डॉ. नामदेव कदम, दादासाहेब काळंगे, गावोगावचे सरपंच, उपसरपंच यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. गोरे म्हणाले, दहा वर्षांपूर्वी माझ्याबरोबर स्टेजवर बसायला कुणीच नसायचे. आज स्टेजवर आणि समोर गर्दीचगर्दी दिसते. जनतेने माझ्यावर मोठा विश्‍वास दाखवला आणि त्या विश्‍वासास पात्र राहून मी ही रात्रंदिवस जनतेची सेवाच केली. साडेचार वर्षांपूर्वी निवडणूकीवेळी दिसलेले विरोधक आता पुन्हा निवडणूका आल्यावरच उगवले आहेत. गावोगावी चार लोकांना गोळा करुन पाण्याचे गाजर दाखवत आहेत. प्रत्येक वेळी निवडणूकीत पक्ष बदलणारे जनतेप्रती खोटा कळवळा दाखवत आहेत.

पाच राज्यात भाजपाने सपाटून मार खाल्ला आहे. महाराष्ट्रातही तीच परिस्थिती होणार आहे. आमचेच सरकार येणार आहे. मतदारसंघातील इंच ना इंच जमिन पाण्याखाली आणण्यासाठीच या जयकुमारचा जन्म झाला आहे. सोळा गावांसह माणच्या उत्तर भागात जिहे-कठापूरचे पाणी आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी शेवटी सांगितले. एम. के. भोसले, अर्जुन काळे, पोपटशेठ काळंगे यांनी मनोगते व्यक्त केली. सुकदेव डुबल यांनी प्रास्ताविक केले. दिगंबर राजगे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)