मलकापूरात आचारसंहिता लागू

सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतच प्रचार, दाखले, परवान्यांसाठी एक खिडकी कक्ष सुरू

कराड – मलकापूर नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतच प्रचार करता येणार आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांना आवश्‍यक असलेल्या दाखले, परवान्यांसाठी लक्ष्मीनगर येथील बहुउद्देशीय इमारतीत एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवडणुक आणि आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर सर्व पक्ष, संघटना आणि इच्छुक उमेदवारांची बैठक सोमवारी मलकापूर नगरपालिका कार्यालयात झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश चव्हाण, संजीवनी दळवी, शहर पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बुधवार, दि. 2 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशनपत्र स्वीकारली जाणार आहेत. उमेदवारांची संगणक प्रणालीमध्ये (ऑनलाईन) भरलेली नामनिर्देशनपत्रेच स्वीकारली जातील. हस्तलिखित अर्ज स्वीकारला जाणार नाही. आचारसंहिता कक्ष, जात पडताळणी कक्ष, नामनिर्देशनपत्रासाठी ऑनलाईन सुविधा कक्ष, विविध परवाने, दाखले देण्यासाठी एक खिडकी कक्ष लक्ष्मीनगर येथील बहुउद्देशीय इमारतीत सुरू करण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)