अमाप वाळू उपशाने ब्रिटिशकालीन तलावाला धोका

मायणीत वाळू माफियांवर कारवाईस टाळाटाळ : महसूल विभाग झोपेत


-महेश जाधव

महसूल विभागाच्या कारभारावरच प्रश्‍नचिन्ह

खटाव महसूल विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे मायणी तलावातील वाळूचा राजरोसपणे बेसुमार उपसा सुरू आहे. मात्र, तरीही महसूल विभागाकडून संबंधित वाळूमाफियांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने महसूल विभागाच्या कारभारावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

33 लाखांचा मुद्देमाल जप्त

मायणीत नुकतीच पोलिसांची वाहने ताब्यात घेतली त्यात सांगली जिल्ह्यातील 20 ते 30 वयातील तरुणांचा समावेश असून त्यांच्याकडून सुमारे 33 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मायणी – मायणी ब्रिटिशकालीन तलावात अनेक ठिकाणी बेसुमार वाळू उपसा केल्याने अनेकांना जीव धोक्‍यात घालावा लागत आहे. शिवाय तलावाचे अस्तित्वही धोक्‍यात आले आहे.

महसूल कार्यालय व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करून वाळूमाफियांच्या मुसक्‍या आवळण्याची गरज आहे. परंतु, प्रशासन वाळूमाफियांत गॅंगवार भडकण्याची वाट पाहत असल्याचा आरोप गावकरी करत आहेत.

वाळूमाफियांकडून रात्रीच्या वेळी मायणी ब्रिटिशकालीन तलावात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उपसा सुरू आहे. त्याला महसूल विभागाचा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच दररोज हजारो ब्रास वाळू बिनदिक्कतपणे चोरीला जात आहे. स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा, मायणी ब्रिटिश कालीन तलावाला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. महसूल खात्याच्या भ्रष्ट कारभारामुळे वाळूमाफियांचे फावते आहे. तलावाच्या पात्रात मोठाले खड्डे पडून तलावाचे अस्तित्वच धोक्‍यात आहे. तलावाच्या बाजूला असणाऱ्या रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मायणीपासून

सातारा सांगलीपर्यंत हा अवैध वाळू उपसा चोरून लपून सुरू असतो. तहसीलदार नवीन येऊनही कारभारात काहीही
फरक पडला नाही. हात ओले होत असल्याने त्यांच्याकडून या वाळूमाफियांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. वाळू माफियांनी तलाव पात्र पोखरून काढले आहे.

तलाव पात्रात दिवसा, रात्री पोकलॅण्डसारख्या संयंत्राच्या साहाय्याने हजारो ब्रास वाळूची चोरी महसूल खात्याच्या मेहरबानीवरून करण्यात येत आहे. वाळूने भरलेल्या ट्रकवर कारवाईचे नाटक करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे कामही संबंधित विभागाचे सुरू आहे. तलाव पत्रात जागोजागी तीस ते चाळीस फुटांचे खड्डे तयार झालेत. त्यामुळे तलाव पात्राला मोठा धोका निर्माण झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)