शैक्षणिक संस्थांमधील रिक्‍त पदांच्या माहितीसाठी ‘अनुशेष’ संगणक प्रणाली

सातारा – राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, इतर शासकीय व निमशासकीय कार्यालये व मंडळे यातील रिक्‍त पदांची माहिती ऑनलाइन पद्धतीने संकलित करण्यासाठी “अनुशेष’ नामक संगणक प्रणाली महाआयटी महामंडळाच्या वतीने विकसित करण्यात येणार आहे.

शासनाने नोकरभरती करून विविध विभागातील रिक्‍त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. सामाजिक व शैक्षणिक मागास संवर्गासाठी 16 टक्‍के आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे. यामुळे सर्वच विभागांच्या बिंदूनामावली या नवीन संवर्गाचा समावेश करून सुधारित बिंदूनामावलीस मान्यता घेण्याचे बंधन घालण्यात आलेले आहेत.

विविध विभागांमधील रिक्‍त पदे व अनुशेष नामक माहिती तत्काळ व अचूकपणे पुरविण्यासाठी महाआयटी महामंडळामार्फत ही नवीन प्रणाली राबविण्यात येणार आहे. बिंदूनामावली संगणक प्रणालीमध्ये काळानुरूप बदल करण्याचे कामही करण्यात येणार आहे. या प्रणालीसाठी 22 लाख, 73 हजार, 535 रुपये एवढा खर्च करण्यात येणार आहे.

ही रक्‍कम इ-गव्हर्नन्स प्रकल्पाच्या तरतुदीतून खर्च होणार आहे. एका वर्षासाठी हे काम महामंडळाला देण्यात येणार आहे. वेबसाइट विकसित करण्यासाठी 11 लाख, 13 हजार 700 रुपये, वेबसाइट सुरक्षेकरिता 1 लाख, 11 हजार, 370 रुपये, हार्डवेअर व सॉफ्टवेअर विकसित करण्याकरिता 1 लाख, 67 हजार, 55 रुपये, इतर कामांसाठी 5 लाख, 34 हजार, 600 याप्रमाणे खर्च करण्याचे नियोजन करण्यात येणार आहेत.

संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे. आता माहिती संकलित करण्याची कामे वेगाने होतील, असे मत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्‍त करण्यात येऊ लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)