फलटणचे पाणीपुरवठा रॉयल्टी प्रकरण दडपण्याचे प्रयत्न

file pic

माजी नगरसेवकांचा आत्महदहनाचा इशारा : महसूलमंत्र्यांना निवेदन

सातारा – फलटण नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील गौण खनिज रॉयल्टी प्रकरणी उच्च न्यायालयाने आदेश देवून देखील जिल्हाकाऱ्यांकडून निर्णय देण्यास वेळकाढूपणा होत असल्याने माजी नगरसेवक सुरेश उर्फ नंदू पवार यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना मागण्याचे निवेदन दिले असून दि.27 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर आत्मदहन करणार असल्याचे सूचित केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलटण नगरपालिकेच्या पाणी पुरवठा टप्पा क्रमांक 5 मध्ये 1 लाख 10 हजार ब्रास गौण खनिज रॉयल्टी न भरता काढण्यात आले व कामाच्या क्षेत्राबाहेर विकण्यात आले. ही एक बाजू असताना दुसऱ्याबाजूला गौण खनिज क्षेत्राच्या बाहेर टाकण्यासाठी पालिकेने 2 कोटी 87 लाख लाख रूपये वाहतूक भाडे अदा केले आहे. या संगनमताने नियोजनबध्द घोटाळा असून त्या विरोधात माजी नगरसेवक सुरेश उर्फ नंदू पवार व सुरेश देशपांडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून निर्णय देण्याचे आदेश दिले होते.

त्यावर जिल्हाधिकाऱ्यांसमोर दि.12 नोव्हेंबर 2018 रोजी दोन तास सुनावणी झाली व दंडासह रॉयल्टी वसूली रक्कम अदा करण्याचे आदेश तत्कालिन नगराध्यक्ष, उपअभियंता व ठेकदार असलेल्या आयव्हीआरएल कंपनीला दिले व ती कार्यवाही पुर्ण करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली.

मात्र, त्यानंतर त्या आदेशावर महसूल अप्पर जिल्हाधिकारी व महसूल उपजिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी झाली.परंतु जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी न झाल्यामुळे अद्याप आदेश पारित होवू शकलेला नाही. त्यामुळे राजकीय हस्तक्षेपाने हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निदर्शनास येत असल्याने अखेर पवार व देशपांडे यांनी रविवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली व तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली.तसेच येत्या 27 डिसेंबर रोजी आत्मदहन करण्याचा लेखी इशाराही दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)