टंकलेखन परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध

स्पीड पॅसेजमध्येही बॅकस्पेस व डिलीट किजचा वापर

सातारा  – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या जानेवारीमध्ये शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षांची प्रवेश पत्रे (हॉल तिकीट) संस्थांच्या लॉगिनमध्ये ऑनलाइनद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. येत्या 5 ते 11 जानेवारी दरम्यान इंग्रजी विषयाच्या 30 व 40 शब्द प्रति मिनिटासाठी टंकलेखन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर 18 ते 23 जानेवारी दरम्यान मराठी व हिंदी विषयासाठी परीक्षा होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यातील इंग्रजी विषयासाठीची प्रवेशपत्रे शासनमान्य संगणक टंकलेखन व लघुलेखन संस्थेच्या लॉगिनवर गुरुवारपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रातील माहितीत दुरुस्ती करावयाची असल्यास संस्थांनी समक्ष परीक्षा परिषदेच्या कार्यालयात उपस्थित राहवे. भविष्यात कुठलीही दुरुस्ती मान्य करून दिली जाणार नाही, असा इशाराही परीक्षा परिषदेकडून देण्यात आलेला आहे.

प्रवेश पत्र मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत बॅच बदल करून देण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. विद्यापीठ परीक्षा, स्पर्धा परीक्षा, केंद्रावरील तांत्रिक कारणे, आकस्मित दुर्घटना या विविध कारणांमुळेच बॅचमध्ये बदल करून देण्यात येणार आहे. बॅच बदलासाठी इ-मेलद्वारे अर्ज करून प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, अशा सूचनाही संस्थाचालक व प्राचार्यांना देण्यात आलेल्या आहेत.

मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही विषयांसाठीच्या परीक्षेतील इ-मेल, लेटर, स्टेटमेंट या प्रश्‍नांसाठी बॅकस्पेस व डिलीट या कीजचा वापर करण्याची मुभा होती; परंतु स्पीड पॅसेजमध्ये मात्र, बॅकस्पेस व डिलीट कीज वापरल्यास विद्यार्थ्याचे गुण कमी होत असत. गुणदान व परीक्षा पद्धतीत बदल करण्यासाठी एक समिती नियुक्‍त करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार स्पीड पॅसेजमध्येही बॅकस्पेस व डिलीट कीजचा वापर करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, असेही परिषदेकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)