फलटण येथे बालसंस्कार प्रश्‍नमंच चतुर्थ कार्यक्रम

विडणी – फलटण येथे मंगळवार, दि. 25 डिसेंबर रोजी, बाल संस्कार प्रश्‍न मंच चतुर्थ कार्यक्रम उत्साहात पार पडला. ध्वजारोहण शांतिकाका सराफ गांधी यांनी केले तर उद्‌घाटन किशोरकुमार सराफ शहा, बारामती यांनी केले. यानंतर फोटो अनावरण, दीपप्रज्वलन होवून मंगलाचरणाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.

मुनीश्रीचे पादप्रक्षालन, मुनीश्री शास्त्र भेट, मुनीश्रींचे अष्टद्रव्य पूजन करून धर्मजीवनाचा आधार याविषयावर सिध्दांत शास्त्री आनंद पाटील, नांद्रे यांचे व्याख्यान झाले. आळस सोडा ज्ञानाभ्यास करा व तुलना नाटिका रत्नत्रय स्वाध्याय मंडळ व पाठशाळेतील विद्यार्थी सादर केली. प्रथमचार्य प. पू. 108 श्री शांतीसागरजी महाराज पाठशाळेच्या विद्यार्थीनी गर्वाचे घर खाली ही नाटिका सादर केली. सिध्दांत शास्त्र उदय पाटील, सांगली यांनी बालकांना संस्कारीत करण्यासाठी बाल संस्कार शिबिर घेतले. प्रथमाचार्य प. पू. 108 श्रीशांतीसागर महाराज पाठशाळेच्या विद्यार्थी नमोकार मंत्राची महिमा ही नाटिका सादर केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वास्तव कथा लेखन, निबंध स्पर्धा, सर्व सभासदांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले. लकी ड्रॉ बक्षीस जाहीर करण्यात आले, यावेळी मुले, ओम गांधी, वीतराग गांधी, सिध्दांत गांधी, मुली, समृध्दी पूर्वत करकंब, पुर्वी कंदी, सृष्टी दोशी यांना यश मिळाले तर वही सजावटमध्ये अनघा गांधी, नंदिनी दोशी, सुनिता दोशी व सर्वात उत्कृष्ट वही अबोली डुडू यांना यश मिळाले. आयोजन अक्षय दोशी यांनी केले होते. सुत्रसंचालन सौ. मंजिरी दोशी यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)