प्राधिकरणाच्या पाईपलाईनला गळती

दररोज हजारो लिटर पाणी वाया; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

शाहूपुरी – येथील बुधवार नाका ते मोळाचा ओढा मुख्य रस्त्यावरच प्राधिकरणाच्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे जलवाहिनीची दुरूस्ती करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. एकीकडे नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर मतकर कॉलनी येथे अनेक महिन्यापासून मुख्य रस्त्यावरच प्राधिकरणाच्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून या पाण्यामुळे रस्त्यातच डबकी साठली आहेत. त्यामुळे येथील भागात त्यामुळे चिखल साचला आहे. गेल्या कित्येक दिवसापासून हीच परिस्थिती असून याकडे प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत आहे.

येथील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तरी संबंधित विभागाने लक्ष घालून जलवाहिनीची दुरूस्ती करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

“आमची या रस्त्यावरून दररोज ये-जा होत असते. मुख्य रस्त्यावरच पाईपलाईनला गळती लागल्यामुळे आम्हाला वाहन चालवताना अडचणी येत आहेत. गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने वेळेत लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
-सुधीर सपकाळ, वाहनचालक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)