‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमास वेण्णानगर शाळेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

file photo

सातारा – बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानांतर्गत वेण्णानगर, ता. सातारा येथे विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. या उपक्रमास प्राथमिक शाळा व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून, माझी कन्या भाग्यश्री योजनेचा प्रचार-प्रसार केला. प्रभात फेरीत लेक वाचावा लेक शिकवा या आशयाच्या घोषणा देण्यात आल्या.

मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, मुलींचा जन्मदर वाढविणे, शिक्षणास प्रोत्साहन देणे, शाळा गळतीचे प्रमाण कमी करणे, अशा अनेक उद्देशांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात पर्यवेक्षिका लीना पवार म्हणाल्या, स्त्री-पुरुष समानतेच्या तत्वानुसार मुला-मुलीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये. मुली जर शिकून सुसंस्कृत झाली तर घर व समाजामध्ये पारदर्शक व निकोप वातावरण राखण्यास मदत होईल. असे विचार मुख्याध्यापिका सौ. वैशाली वीर यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरपंच सुषमा सतीश जाधव व ग्रामसेवक साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमास उपसरपंच विनय कडव, पंचायत समितीच्या माजी सदस्या पार्वती कडव, सुजाता जाधव, संगीता साबळे, अविनाश साबळे, राधिका बोधले आदी मान्यवर उपस्थित होते. शीला साबळे यांनी प्रास्ताविक केले. अंगणवाडी सेविका वनिता बोधले यांनी सूत्रसंचालन केले. आभार रत्नमाला गणमुखे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)