‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही

विद्यार्थ्यांना सीईटीची तयारी करणे शक्‍य होणार

सातारा – उच्च शिक्षण संचालनालयच्या अखत्यारीतील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेसाठी मागील वर्षाचा अभ्यासक्रम यावर्षी कायम ठेवण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल करण्यात आले नाही, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तीन व पाच वर्षे विधी अभ्यासक्रम, बीएड, एमएड्‌, बीपीएड्‌, एमपीएड्‌, बीए-बीएड्‌ आणि बीएस्सी-बीएड्‌ (एकात्मिक), बीएड्‌-एमएड्‌ (एकात्मिक) ह्या उच्च शिक्षण विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी राज्य सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेतली जाते. त्यांच्यामार्फत ही प्रवेशप्रक्रिया राबविली जाते.
दरम्यान, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी तीन व पाच वर्षे विधी अभ्यासक्रम, बीएड्‌, बीपीएड्‌, बीए-बीएड्‌ आणि बीएस्सी-बीएड्‌ (एकात्मिक) या अभ्यासक्रमाच्या सीईटीचा अभ्यासक्रम मागच्या वर्षी जो होता, तोच कायम ठेवावा, अशी विनंती पत्राद्वारे राज्य सीईटी सेलकडे केली होती.

त्या पत्राचा संदर्भ प्रसिद्ध करून राज्य सीईटी सेलने येत्या सीईटीसाठी या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बीए-बीएड्‌ आणि बीएस्सी-बीएड्‌ (एकात्मिक) आणि बीएड्‌-एमएड्‌ (एकात्मिक) ह्या अभ्यासक्रमात गतवर्षी बदल करण्यात आला होता. तर, उर्वरित सर्व अभ्यासक्रमांत बदल दोन वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2018-19 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी सीईटीसाठी अभ्यासक्रमात बदल होणार आहे? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांपुढे पडला होता. राज्य सीईटी सेलने अभ्यासक्रम तोच राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने, विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे.

दरम्यान, या सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटीसाठी प्रश्‍नांची संख्या, किती मार्काला प्रश्‍न असतील, एकूण किती गुणांची परीक्षा होणार आहे, त्याबाबतची सविस्तर माहिती राज्य सीईटी सेलने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. तसेच, मागच्या वर्षीच्या अभ्यासक्रमही जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना सीईटीची तयारी करणे शक्‍य होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)