महाबळेश्‍वर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर

सातारा – महाबळेश्‍वर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. त्याचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे उच्च प्राथमिक गट (इ. 6 वी ते 8 वी) प्रथम क्रमांक पाचगणी न. पा. शाळा क्र. 2 मधील कु. किशोरी किसन कांबळे हिने पटकावला. तिने टाकाऊ पासून टिकाऊ निर्मिती या उपक्रमाची मांडणी केली होती. द्वितीय क्रमांक जि. प. प्राथमिक शाळा, आमशीने मिळवला. संस्कार मोरे याने ए. टी. एम. लॉकर हे उपक्रम तयार केले होते. तृतीय क्रमांक भिलार केंद्रशाळेने मिळविला. उंदराचा सापळा हे उपकरण कु. इशरत मूहिद शेख हिने सादर केले होते.

माध्यमिक गट (इ. 9 वी ते 12 वी) इलाबेन मेहता विद्यालय व ज्यु. कॉलेज, तळदेव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नरेंद्र सुतार याने अल्प पाण्यावर पारस बाग शेती हे उपकरण निर्माण केले होते.द्वितीय क्रमांक महाबळेश्‍वर येथील अंजुमन खै. उर्दू हायस्कुलने मिळावला असून फायजा रहीम डोंगरे हिने, हायड्रोक्‍लिक क्रेन हे उपकरण ठेवले होते. तृतीय क्रमांक शेठ गंगाधर माखरिया हायस्कुल,महाबळेश्‍वर याने मिळवला. युरीनल किट हे उपकरण दशरथ भंडारे या विद्यार्थ्याने तयार केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती गटामध्ये चिखली शाळेचे शिक्षक विष्णु ढेबे यांच्या,बहुउद्देशीय फलक या उपक्रमाला प्रथम क्रमांक मिळाला. प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती गटात कुंभरोशी शाळेच्या शिक्षिका सुजाता दिलीप ढेबे यांनी पटकावला. त्यांनी लेक वाचवा अभियान हे उपकरण सादर केले होते. माध्यमिक शिक्षक लोकसंख्या शिक्षण गटात व्यसनमुक्ती या उपकरणाला, संतोष ढेबे (माखरिया हायस्कुल) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.प्रयोगशाळा परिचर प्रायोगिक साहित्य निर्मिती गटात, इफेक्‍ट ऑफ लाईट या उपक्रमास माखरिया हायस्कूलमधील मनोज अवघडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

याबद्दल तालुक्‍याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, मधुसागर संस्थेचे चेअरमन संजय गायकवाड, व्हाईस चेअरमन सुभाष सोंडकर, नगराध्यक्षा स्वप्नाली कुमार शिंदे (महाबळेश्‍वर) व सौ. लक्ष्मी कऱ्हाडकर (पाचगणी) तसेच सर्व नगरसेवक, पंचायत समितीच्या सभापती रुपाली राजपुरे, उपसभापती कदम, सर्व सदस्य, गटविकासाधिकारी दिलीप शिंदे, विस्ताराधिकारी सुनील पारठे, गटशिक्षणाधिकारी सांगळे, शिक्षण विसताराधिकारी डी. एस. भोसले, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक दिलीप ढेबे, कृतिशील शिक्षक रियाज महापुळे, सरपंच व सदस्य, शिक्षण समितीचे पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)