वीज कर्मचाऱ्यांचे आज काळ्या फिती लावून काम

वडूज – वीज कंपनीच्या चारही शाखांतील कर्मचारी मंगळवारी दि. 1 जानेवारीला काळ्या फिती लावून काम करणार आहेत तर दि. 7 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार असल्याची माहिती विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुनिल गडकरी यांनी दिली.

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, इलेक्‍ट्रीक वर्कर्स फेडरेशन, वीज कामगार महासंघ, सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन, वीज तांत्रिक कामगार संघटना, वीज कामगार कॉंग्रेस (इंटक) या संघटनांनी हा आंदोलनाचा नारा दिला आहे. वीज कंपनीकडे प्रलंबीत असणाऱ्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. उर्जामंत्री व कंपनी व्यवस्थापनामध्ये चर्चेच्या काही फेऱ्या देखील झाल्या, मात्र प्रश्‍न मार्गी लागले नाहीत.

कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत वीज कंपनी व सरकारच्या नकारात्मक भूमिकेवर नाराजी व्यक्त झाली. त्यामुळे वीज कंपनीच्या चारही शाखांतील कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी दि. 1 रोजी काळ्या फिती लावून व दि. 7 रोजी एक दिवशीय लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला आहे.

दि. 1 रोजी यादिवशी कर्मचारी आपापल्या कार्यालयाच्या ठिकाणी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. सोमवार, दि. 7 रोजी जिल्ह्यातील सर्व विभागीय व मंडल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. या संपात जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन संयुक्त कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)