पोलीस कर्मचारी व नातेवाईकांची आरोग्य तपासणी

सातारा – पोलीस दलाच्या दैनंदिन व्यस्त कामाजमध्ये त्याच्या निरोगी आरोग्याची जपणूक व्हावी या अनुषंगाने सातारा शहर, शाहूपुरी व तालुका पोलीस स्टेशन कर्मचारी व त्याच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस करमणूक केंद्र अलंकार हॉल येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आरोग्य तपासणी सुरु होती.

यामध्ये रक्तदाब तपासणी, साखर तपासणी, इको-कॉर्डिओ ग्राफ, हाडांची घनता व इतर तपासण्या करण्यात आल्या. सातारा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सातारा यांच्या सौजन्याने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक शाहूपुरी सातारा यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी व त्याचे कुटूंबीय याचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले असून पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्याचे कुटूंबीय यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला आहे. सातारा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी शिबिराचे आयोजन केले होते. यासाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशचे प्रवीण पाटील व त्याचे सहकारी उपस्थित होते. सातारा शहर, तालुका व शाहूपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी अधिकारी, व त्याच्या नातेवाइकांनी याचा लाभ घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)