‘सोना अलॉईज’ विरोधात कामगारांचे कामबंद आंदोलन

लोणंद – खंडाळा तालुक्‍यातील लोणंद येथील औद्योगिक वसाहतीतील (एम.आय.डी.सी.) स्टील (पिग आयरन) उत्पादन करणाऱ्या सोना अलॉईज प्रा. लि. कंपनीविरोधात सोना अलॉईज एम्प्लॉईज युनियनच्या कामगारांनी गेली चार दिवसांपासून पगारवाढ व अन्य मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सुमारे 250 कामगार सहभागी झाले आहेत. कंपनीच्या गेटवर हे आंदोलन सुरू आहे.

लोणंद औद्योगीक वसाहतीत सोना अलॉईज प्रा. लि. हीस्टील (पिग आयरन) उत्पादन करणारी पश्‍चिम महाराष्ट्रातील मोठी कंपनी आहे. या कंपनीतील युनियनच्यावतीने पगारवाढ व अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी कंपनी व्यवस्थापनाच्या आडमुठे धोरणामुळे काम बंद आंदोलन करावे लागत आहे. मात्र हे आंदोलन करत असताना आम्ही कोणत्याही कामगाराला अटकाव करीत नसून शांततेच्या मार्गाने करीत असल्याचे युनियनचे अध्यक्ष विश्‍वास क्षीरसागर यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोना अलॉईज कंपनीमधील कामगार युनियन व कंपनी व्यवस्थापनामध्ये गेल्या काही दिवसापासून विविध मागण्यासंदर्भात बैठका सुरु होत्या. कंपनी व्यवस्थापन प्रत्येक वेळी कामगारांच्या मागण्यांकडे गाभीर्याने पाहत नसल्याने कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यामधील बैठका निष्फळ ठरल्या.

त्यामुळे चार दिवसांपासून एम्प्लॉईज कामगार युनियनच्यावतीने काम बंद आंदोलन करण्यात आले. कामबंद करून दोन दिवस कंपनीच्या आवारात कामगार बसून होते. परंतु शनिवारी, 30 रोजी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना आवारात बसण्यास मज्जाव केल्याने कामगार युनियनच्यावतीने कंपनीच्या गेट समोर आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, लोणंद औद्योगीक वसाहतीत सोना अलॉईज प्रा. लि. या कंपनीत सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, कोरेगाव, तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती तालुक्‍यातील शेकडो कामगार या कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)