एक पाऊल सकारात्मकतेचे

-वकील सुचित्रा घोगरे-काटकर

आपण सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्षात आपण केलेले सर्व संकल्प सिद्धीस जावो ही सदिच्छा. आजचे सकारात्मक पाऊल हे आपल्या प्रत्येकात असलेल्या सकारात्मकतेवर. नवीन वर्षानिमित्ताने आपण विविध संकल्प केले असतीलच. यातच अजून एक महत्वाचा संकल्प करू या. तो म्हणजे येणाऱ्या प्रत्येक दिवशी सकारात्मक राहण्याचा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आजपर्यंतच्या लेखांमध्ये आपण आपल्याच आसपास असलेल्या सामान्य माणसांमधील सकारात्मकतेची विविध उदाहरणे पहिली. या सादरात ज्या-ज्या व्यक्तीच्या सकारात्मक पावलांविषयी लिहिले त्या प्रत्येक व्यक्ती खूप मोठ्या, प्रसिद्ध वा नामवंत नव्हत्या. तर त्या आपल्यातीलच एक होत्या. या सर्वसामान्य व्यक्तींनी जीवनात एका वळणावर आलेल्या आपत्तीच्या वेळी, संकटाच्या वेळी सकारात्मक विचार करून स्वतःचे आणि इतरांचेही जीवन सुकर केले, सुंदर केले आहे. त्या व्यक्तींचे उदाहरण सामोरे ठेवून आपण निराशेच्या वेळी सकारात्मक पाऊल उचलू या.

आज साऱ्यांचेच जीवन अनेक आव्हानांनी भरलेले आहे. स्पर्धेच्या या युगात शिक्षण, नोकरी, व्यवसाय याचबरोबर जीवनातील विविध अडचणींना आपल्याला पावलोपावली सामोरे जावे लागत आहे. यामुळे मनात सतत निराशेचे ढग भरून येत आहेत. यातूनच माझा अभ्यास होत नाही, मला नोकरी मिळणार नाही, मला धंदा-व्यवसाय करायला जमणार नाही, हे मला येत नाही, ते आपल्याला जमणार नाही, हे मी करू शकत नाही, माझ्या नशिबात हे नाहीच, माझं नशिबाच फुटकं, आजचा काळ चांगला नाही, काहीही करायचे म्हटले की पैसा हवाच, पैश्‍याशिवाय माणूस काही करू शकत नाही, मला अमुक एक व्यसन सुटू शकत नाही इ. इ. हा नकारात्मक पाढा वाढतच जातो.

एकदा का “नाही’ असा नकारात्मक विचार मनात आला की मन अजूनच निराशेकडे झुकत जाते. निराश झालेल्या मनात मग नकारात्मक धारणा पक्क्‌या होतात. या नकारात्मक धरणांबरोबर आपण जगू लागतो आणि आपण आपला आत्मविश्‍वास हरवून बसतो. हा हरवलेला आत्मविश्‍वास परत मिळवायचा असेल तर सकारात्मक विचार केल्याशिवाय पर्याय नाही.

नवीन वर्षानिमित्त आधी आपल्यातील धारणा तपासा. सर्वप्रथम नकारात्मक धरणांना मनातून हद्दपार करा. कारण जोपर्यंत आपण आपल्यातील नकारात्मक भावना मनातून काढून टाकत नाही तोपर्यंत आपण आपल्यात सकारात्मक बदल घडवू शकत नाही. ज्या सकारात्मक धारणा आहेत त्या सिद्धीस जाण्यासाठी संकल्प करा. आपले संकल्प सिद्धीस जाण्यासाठी नकारात्मक धारणा आणि आपल्यातील आळस हे दोन घटक मुख्यत्वे जबाबदार आहेत हे लक्षात घ्या.

आपल्या आसपासच्या या व्यक्ती सकारात्मक विचार करून खूप काही करू शकतात. मग आपण का नाही? हा विचार आपल्या मानत यावा आणि आपणही निराशेच्या वेळी जेव्हा जेव्हा मनात नकारात्मक विचार येतील तेव्हा त्या नकारात्मकतेवर मात करत सकारात्मक विचार करण्याच्या संकल्प आज करूयात. नवीन
वर्षानिमित्त आपल्यातील सकारात्मकतेला साद घालू या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)