वर्ष नवे…! संकल्प नवे…!

सातारा : अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा विविध क्षेत्रात कमालीचा चढउतार अनुभवणाऱ्या 2018 वर्षाने कडू गोड आठवणींचा अनुभव दिला. परंतु पुन्हा नवी सुरुवात, नवी आशा घेऊन 2019 साल वाजत गाजत आयुष्यात सामोरे आले. तसे नवीन वर्ष म्हणजे नवीन संकल्पांचा गोरज मुहूर्त या मुहूर्तावर अनेक गोष्टी सुरू करण्याच्या इच्छा व्यक्‍त केल्या जातात.

त्यानुसार सातारा जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनीही विकासाच्या नव्या वाटा काय असतील याचे संकेत देत आपले संकल्प “दै. प्रभात’शी संवादातून उलगडले. त्याचा हा लेखाजोखा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हुकमशाहीचे सरकार हद्दपार करणार

सातारा जिल्ह्यासह कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला समृध्दीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा आगामी वर्षाचा संकल्प केला आहे. देशाच्या प्रमुखांनी येथील जनतेला अडचणीत आणण्याचे काम केले. त्यांच्या बेजबाबदार कार्यप्रणाली, हुकुमशाही कारभारामुळे शेतकरी व कामगार उध्दवस्त झाला आहे. नोटाबंदी सारख्या निर्णयामुळे विशेषत: कामगारांना बेरोजगार व्हावे लागले आहे. शेतकरी विरोधी धोरणांमुळे या सरकारच्या काळात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्याचबरोबर लोकशाही मोडीत काढून हुकुमशाही राजवट आणण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो हाणून पाडण्यात येणार आहे. अशावेळी आगामी वर्षामध्ये हे सरकार कोणत्या ही परिस्थिती हद्दपार करण्याचा संकल्प केला असल्याचे आ.शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
-आमदार शशिकांत शिंदे, कोरेगाव

मतदारसंघ सुजलाम, सुफलाम करणार

कायम दुष्काळाचा कलंक माथी असलेल्या माण खटाव तालुक्‍यातील जनतेला मी आमदार म्हणून दिलेली अश्‍वासने पाळली आहेत. माण असेल माझा खटाव असेल दोन्ही तालुक्‍यात पाणी यावे म्हणून मी झटलो. त्याचे फलीत आपण पाहिलेच आहे. दोन्ही तालुक्‍यात आलेल्या पाण्याचा लाभा माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला कसा होईल, यासाठी सध्या मी काम करत आहे. पाणी नाही म्हणून बाहेरगावी नोकरीला जाणारा या तालुक्‍यातील युवकांचा लोंढा कमी करणे माझे स्वप्न आहे. जिहे कटापूर, उरमोडीचे पाणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या शेतात खळाळल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. माण खटाव तालुके सुजलाम सुफलाम करणे हाच माझा संकल्प आहे.
-आमदार जयकुमार गोरे, माण-खटाव

तालुक्‍याच्या विकासाचा वेग कायम ठेवणार

विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली विकासाचा वेग कायम ठेवणार. स्वच्छता अभियान असो किवा इतर कोणातेही विकासाच्यासाठीचे अभियान यात फलटण शहर व तालुका हा कायम अघाडीवर ठरवण्याचा माझा प्रयत्न असेल. फलटण तालुका हा विकासाचे रोल मॉडेल म्हणून राज्यात आदर्श ठरेल, यासाठी कायम प्रयत्न करणे हाच माझा संकल्प असेल.
-आमदार दीपक चव्हाण, फलटण

विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा करणार

सातारा पालिकेत कर्मचाऱ्यांचा सौजन्य सप्ताह आणि खा. उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार विकास कामांचा सातत्याने पाठपुरावा हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. “नगराध्यक्ष आपल्या दारी’ ही योजना याच संकल्पाला अनुसरून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सातारा शहराच्या 10 प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर तातडीच्या उपाययोजना हेच माझे उदिष्ट आहे. एकुण बजेटच्या 15 टक्‍के निधी हा नगराध्यक्षांच्या विशेष अधिकारात येत असल्याने तो निधी प्रामुख्याने सातारा शहरासाठी कसा वापरता येईल त्याचे मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. संकेतानुसार आघाडीतील सर्व नगरसेवकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि सातारा शहराच्या चार दिशांना वेगळे विकास प्रकल्प हा सुध्दा आमचा नवीन संकल्प आहे. याकरिता प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. सातारा शहरातील रंगकर्मींसाठी महत्वाचे केंद्र असलेल्या शाहू कला मंदिराच्या परिसरातच छोटे ऍम्फी थिएटर सुरू करण्याचे नियोजन असून त्याकरिता जास्तीत जास्त निधी दिला जाणार आहे.
-माधवी कदम, नगराध्यक्षा – सातारा नगर पालिका सातारा

सुपरस्पेशालिटीसाठी निधीची मागणी

क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयाला पश्‍चिम महाराष्ट्रात सुरपस्पेशालिटी रूग्णालयाचा दर्जा देणे हाच नवीन वर्षाचा संकल्प आहे. गेल्या चार महिन्यापासून या कामाला प्रत्यक्षपणे सुरूवात झाली आहे. या प्रक्रियाअंतर्गत सांडपाणी नियोजन प्रकल्प या करता सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 114 कोटींचे महिला वैद्यकीय महाविद्यालय प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याचा प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. याशिवाय सिटी स्कॅन मशिनसाठी तळमजल्यावर विशेष कक्ष निर्माण करण्यात येणार असून याशिवाय पुढील 15 दिवसात केमोथेरपी सुविधा सातारा जिल्ह्यातील रूग्णांसाठी उपलब्ध करणे हा एक महत्वकांक्षी प्रकल्प तडीस जात आहे. सातारा जिल्हा रूग्णालयातील एमडी मेडिसीन या पदांची असणारी उणीव लवकरच भरून काढली जाणार आहे. छोट्या छोट्या सुविधा आणि कारभारातील सातत्य संवादातून राखणे हाच खरा नवसंकल्प म्हणता येईल.
-डॉ. अमोद गडीकर, जिल्हा शल्य चिकित्सक – सातारा जिल्हा रूग्णालय


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)