मलकापूरची प्रभागनिहाय मतदार अंतिम यादी प्रसिद्ध

कराड  -मलकापूर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करुन निवडणूक आयोगाने मतदार यादीत काही बदल करत प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम यादीनुसार 8 हजार 860 स्त्रिया व 9 हजार 770 अशा एकूण 18 हजार 630 मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

मलकापूर नगरपंचायतीला उच्च न्यायालयाच्या आदेशाने “क’ वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळाला. त्यानुसार नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक गुरुवारी जाहीर झाली. केवल महिन्याभरात या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार असून 2 जानेवारीपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. मलकापूरचा राजकिय आखाडा या प्रक्रियेमुळे चांगलाच तापला असून कॉंग्रेस, भाजपासह इतर राजकीय गटांच्या गुप्त बैठका सुरु झाल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी अधिप्रमाणित करुन शहरातील मुख्य ठिकाणी या याद्या लावण्यात आल्या आहेत. सोमवार, दि. 31 रोजी मतदान केंद्राची अधिकृत यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दरम्यान ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या अंतिम मतदार याद्या पाहण्यासाठी नागरिक गर्दी करु लागले असल्याचे पहावयास मिळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)