चाफळला व्ही. व्ही. पॅट मशिन प्रात्यक्षिक

चाफळ – निवडणुक आयोगाकडून आगामी लोकसभेच्या निवडणुकीकरीता एम-3 बनावटीचे ई. व्ही. एम. व व्ही. व्ही. पॅट मशीन वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाटण विधानसभा मतदारसंघातील चाफळ विभागातील मतदारांना त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असल्याची माहिती चाफळ मंडलाधिकारी व्ही. एम. कुंभार यांनी दिली.

चाफळ विभागातील शिंगणवाडी, चाफळ, जाधववाडी, गमेवाडी येथे याचे प्रात्यक्षिक झाले असून दि. 31 डिसेंबर रोजी उरुल, ठोमसे, बोडकेवाडी, माजगाव, दि. 1 जानेवारी रोजी नाणेगाव खुर्द, खराडवाडी, कवठेकरवाडी, जाळगेवाडी, कडववाडी, दि. 2 रोजी दाढोली, खोनोली, वाघजाईवाडी, कोचरेवाडी, बहिरेवाडी, डेरवण, दि. 3 रोजी सडावाघापुर, सडानिनाई, सडादाढोली, केळोली, पाडळोशी, चव्हाणवाडी, धायटी या गावामधील मतदान केंद्रावरती ई. व्ही. एम. मशिन व व्ही. व्ही. पॅट यंत्राचा निवडणुकीसाठी प्रथमच वापर होणार असल्यामुळे त्यांची मतदारांना ओळख व माहिती असणे आवश्‍यक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपण ज्या उमेदवारास मत दिले आहे. त्याच उमेदवाराला मत पडले की नाही याची खात्री करता येणार आहे. त्याच अनुषंगाने चाफळ विभागातील गावांमध्ये जागृती होणे महत्वाचे आहे. तरी वरील गावांमधील मतदारांनी, पदाधिकारी यांनी उपस्थित राहून आपल्या शंकाचे निरसन करण्याचे आवाहन मंडलाधिकारी कुंभार यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)