हिंगणगाव बुद्रुक शाळेत मराठी भाषा पंधरावडा उत्साहात

हिंगणगाव बुद्रुक : मराठी भाषा या विषयावर मार्गदर्शन करताना मठाधिपती विठ्ठलस्वामी,आबासो माळी व मान्यवर.

कडेगाव – प्राथमिक शाळा हे शिस्त, संस्कार व संस्कृतीचे केंद्र आहे. मराठी भाषेचा गौरव जगातील 56 भाषांनी केला आहे. अशा मराठी भाषेत शिक्षण देणाऱ्या शाळांतून मुलांना गर्वाने व अभिमानाने शिक्षण घेण्याची संधी द्या असे आवाहन जयरामस्वामींचे वडगाव येथील मठाधिपती ह. भ. प. विठ्ठलस्वामी महाराज यांनी केले आहे.

कडेगाव तालुक्‍यातील हिंगणगाव बुद्रुक प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या मराठी भाषा पंधरावडा व लेक शिकवा अभियानात पालकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्रातील बहुतांशी अधिकाऱ्यांचे व यशस्वी व्यक्तींचे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झालेले आहे. महाराष्ट्र साधुसंतांची भुमी आहे. साधुसंतांनी मराठी भाषेवर प्रेम केले. अनेक गुणवैशिष्ठे असणारी मराठी भाषा जतन करुन लौकीक वाढविण्याची जबाबदारी पालकांची आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्व जाती धर्माच्या मुलांना एकत्रित बसून शिक्षण घेण्याचे ठिकाण शाळा आहेत. या मराठी भाषेबरोबर मराठी खाद्य मुलांना दिले पाहिजे. मराठी भाषेपासून दूर गेलेल्यांना आता मानसोपचार तज्ज्ञांची गरज भासत आहे असे विठ्ठलस्वामी यावेळी म्हणाले. दरम्यान, प्रगतशील शेतकरी आबासो माळी यांनी विषमुक्त अन्नाची निर्मिती करुन ते अन्न आहारात वापरण्याचे आवाहन केले. शिक्षणतज्ज्ञ के. डी. कदम यांनी मराठी भाषा व जुन्या, नव्या शिक्षण पद्धतीचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे संयोजन विलासराव आपटे यांनी केले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, पालक उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ मुख्याध्यापक रघुनाथ जगदाळे, विलासराव आपटे, महादेव तोडकर, स्मिता सावंत, रमिला तडवी, शकुंतला पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची उपस्थिती होती. आभार रघुनाथ जगदाळे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)