सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन सुट्ट्या बुडणार

संग्रहित छायाचित्र....

सातारा – यंदाच्या 2019 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन सुट्ट्या बुडणार आहेत. कर्मचाऱ्यांनी दरवर्षी विविध सण, उत्सव व जयंती निमित्त दरवर्षी 24 शासकीय सुट्ट्यांची तरतूद करण्यात येते. त्याप्रमाणे यंदाच्या वर्षी ही सुट्टयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, यंदाच्या वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल), दिपावली लक्ष्मीपूजन (27 ऑक्‍टोंबर) व ईद-ए- मिलाद (10 नोव्हेंबर) या दिवशी रविवार येत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कर्मचाऱ्यांच्या तीन सुट्ट्या बुडणार आहेत.

मागील दोन वर्षात अशा प्रकारे बुडणाऱ्या सुट्ट्यांची संख्या दोन होती. त्यामध्ये यंदाच्या वर्षी एकने भर पडली आहे. बुडालेल्या सुट्ट्यांमुळे मात्र शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये साहजिकच नाराजी निर्माण होणार आहे.

तसेच ज्याप्रमाणे सलग सुट्ट्या आल्यानंतर पर्यटनाचा आणि उत्सवांचा आनंद लुटता येतो, तसा आनंद या वर्षी कमी प्रमाणात घेता येणार आहे. ही एक बाजू असली तरी पाच दिवसांचा आठवडा करावा आणि शनिवारी व रविवारी दोन दिवस सुट्ट्या द्याव्यात अशी देखील मागणी कर्मचारी करीत आहेत. त्यावर सरकार काय निर्णय घेते हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)