कर्करोगाचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब

उंब्रज – ग्रामीण भागातील महिला व पुरुष यांच्यामधील कर्करोगाचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब असून कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राथमिक तपासणी करणे अत्यंत गरजेची आहे. असे मत स्त्री रोग तज्ञ डॉ. राधिका जोशी यांनी व्यक्त केले.

उंब्रज, ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने साक्षरता मोहिमेअंतर्गत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील कोरबू, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार, माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, तसेच कृष्णा हॉस्पिटलच्या स्त्री रोग तज्ञ यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. जोशी म्हणाल्या, स्त्रियांनी कोणताही आजार होण्यापूर्वी त्याचे निदान करुन उपचार घेणे गरजेचे आहे. आजाराकडे दुर्लक्ष न करता त्याची योग्य ती तपासणी करावी. तालुक्‍यातील नागरिकांनी न घाबरता कॅन्सर तपासणी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)