स्नेहसंमेलन हे कलागुणांचे प्रदर्शन : उमेश सणस

वाई  – स्नेहसंमेलन म्हणजे कलागुणांचे प्रदर्शन असते. वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे निर्मितीचा उत्सव असतो, असे उद्‌गार प्रसिध्द लेखक ऍड. उमेश सणस यांनी काढले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्हीजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ऍड. सणस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी सौ. रोहिणी सणस, संस्था समन्वयक प्रदीप वाजे, शाला समितीचे अध्यक्ष डॉ. अभय देशपांडे, डॉ. प्रकाश सावंत, अविनाश जोशी, सौ. रश्‍मी शेवडे, प्राचार्या श्रीमती भारती झिमरे, मुख्याध्यापिका सौ. रोहिणी गोखले, सौ. सुरेखा जाधव, भारती जैन, जयश्री ओसवाल, डॉ. चंद्रशेखर कांबळे यांची प्रमुख उपस्थित होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऍड. सणस पुढे म्हणाले, आपल्या पाल्यांच्या प्रगतीसाठी पालक अत्यंत सजग आहेत. पाल्यासाठी ते वेळेबरोबर खर्चही करीत आहेत. अशावेळी तरुण पिढीची जबाबदारी वाढते आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःचा शोध घेऊन निर्मितीसाठी प्रयत्न करावेत. हा स्नेहसंमेलनाचा उद्देश असतो. चांगल्या शाळा व विद्यार्थी यांच्यासाठी स्नेहसंमेलन ही एक संधी असते. स्वत:ची व शाळेची चांगली ओळख समाजापुढे नेण्यासाठी या संधीचा उपयोग करता येतो. 19 वे शतक इंग्लंडचे होते, विसावे शतक हे अमेरिकेचे होते. मात्र गुणवान मुलांमुळे 21 वे शतक हे फक्त भारताचेच असेल, असा विश्‍वास या स्नेहसंमेलनामध्ये सहभागी झालेली नवी पिढी आपल्याला देत आहे.

ऍड. प्रभाकर सोनपाटकी यांनी मार्गर्शन केले. तर मुख्याध्यापिका सौ. विद्या राव यांनी शाळेच्या प्रगतीचा आढाव सादर केला. यावेळी ऍड. सणस व सौ. सणस यांच्या हस्ते हस्तकला प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्री प्रायमरी विभागाने 13 ग्रुप डान्स तर प्रायमरी विभागाने 10 ग्रुप डान्स व नाटिका सादर केली.

कार्याध्यक्षा सौ. पार्वती वाडकर यांनी परिचय करून दिला. संस्था प्रतिनिधी सौ. स्वाती शेंडे प्रास्ताविक केले. सौ. अपर्णा सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले. सौ. स्वातिका महांगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)