सुर्ली येथे पोलिसांच्या वतीने जनजागरण मोहिम

रहिमतपूर – परिसरात रात्रीच्या वेळी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे . पोलिसांची रात्र गस्त पथके कार्यरत आहेत. परंतु पोलिसांना सहकार्य करण्यासाठी प्रत्येक गावात रात्रीची गस्त पथके तयार करावी असे आवाहन राहिमतपूर पोलीस स्टेशनचे सपोनि घनशाम बल्लाळ यांनी केले आहे .

सुर्ली ता .कोरेगाव येथे चोरी झाल्यामुळे रहिमतपूर पोलीस स्टेशनच्या वतीने प्रत्येक गावात जनजागृती करण्यात येत आहे. परीसरातील धामणेर ,कठापूर, कण्हेरखेड , साप , वेळू , वाठार , पिंपरी , बोरगाव किरोली , आर्वी नागझरी तारगाव दुर्गळवाडी इत्यादी प्रमुख गावात स्वतः सपोनी घनशाम बल्लाळ यांनी ग्रामपंचायत कार्यालयात उपास्थित राहून ग्रामस्थांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे .

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तारगाव येथे ग्रामस्थांच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले , परिसरात रहिमतपूर व तारगांव अशी दोन रेल्वे स्टेशन आहेत . तसेच राष्ट्रीय महामार्ग जवळून जात आहेत .परराज्यातील चोरटे लांबचा प्रवास करून कुठेही चोऱ्या करून रातोरात पसार होत आहेत . अत्यंत क्रुरतेने चोऱ्या लुटमारी करून चोरटे जीवितास हानी पोहचवीत आहेत .पोलिस गस्ती पथकास मर्यादा आहेत. यासाठी ग्रामस्थांनी गस्त पथके तयार करून आपल्या गावाचे , घराचे संरक्षण करावे व पोलिसांनी सहकार्य करावे , असे आवाहन बल्लळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)