बुधवारी ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात लाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी

सातारा – शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्‍यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहेत.

बुधवार दि. 2 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता लाभार्थी आणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारा थेट लाईव्ह संवाद मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे. हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवर, ट्विटर हॅण्डलवर आणि यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक पेज आणि यु ट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण), उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सूक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)