माॅर्निंग वाॅकवेळी वाहनाची धडक, विवाहिता ठार

वडूज- येथील प्रतिष्ठित व्यापारी बाळासाहेब गोडसे हे त्यांच्या परिवारासह मॉर्निग वॉकवरून येताना ग्रामीण रुग्णालय परिसरात सकाळी अज्ञात वाहनाने तिघांनाही ठोकरले. यामध्ये बाळासाहेब गोडसे यांची सून किरण आकाश गोडसे (वय 23) यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला तर इतर जखमींवर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, पहाटेच्या वडूज-कराड रस्त्यावर नेहमीच मॉर्निग वॉकसाठी वडूजकर जात असतात. यामध्ये प्रसिद्ध व्यापारी बाळासाहेब आनंदराव गोडसे, त्यांच्या पत्नी शोभा बाळासाहेब गोडसे व त्यांची सून किरण आकाश गोडसे हे कुटूंब नेहमीच मॉर्निग वॉकसाठी या रस्त्यावरून जात असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शनिवारी सकाळी मॉर्निग वॉक वरून येत असताना वडूज ग्रामीण रुग्णालय परिसरातील वडूज-कराड रोडवर अज्ञात वाहनाने तिघांनाही ठोकरले. यात तिघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला. कालांतराने वडूज मधील काही नागरिकांनी या तिघांना वडूज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिघांनाही सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, किरण आकाश गोडसे यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर बाळासाहेब गोडसे यांचीही प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरण गोडसे यांच्या पश्‍चात पती, एक मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)